- ( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. )
- उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ
- पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
- त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून
- दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
- त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा
- अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
- ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती
- आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
- हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे
- पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी.
- आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )
- आई, असं का ग केलंस?
- का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
- मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
- तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता
- झाला मला.
- माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त
- तुझ्याचमुळे ग.
- आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि
- रडू नकोस.
- आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
- तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
- राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
- तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
- भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात
- असूनही मी त्याला
- हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने
- ढकलत असे. मला लागायचं.
- तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच
- असते!
- कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी
- ठेव.
- ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली
- आहे.
- मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"
- आहे,
- जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,
- तुला बघण्याचा!
- एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास
- सोसल्यावर तुझा जन्म झाला.
- मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या
- आईला बघण्यासाठी मला अजून
- सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर
- पडलात.
- रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग
- तू पप्पांना
- गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती
- काळजी वाटते,
- हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर
- काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
- तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट
- फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
- "मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो
- पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
- "सर, अबोर्शन करा..."
- डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
- मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे
- जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या
- मोठ्या आईला म्हणाले,
- की माझ्या आईला लवकर बर कर....
नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
- मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
- आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत
- जायचं आहे.
- राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
- आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या
- कानाशी म्हण....
- 'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
- ............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच......
- --
- समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
{मेल फॉरवर्ड}
गुरुवार, २७ जानेवारी, २०११
मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा