पृष्ठे

गुरुवार, २७ जानेवारी, २०११

कशावरही प्रेम कर................


कशावरही प्रेम कर . प्रेम कर . . . .
कशावरही प्रेम कर . . . .
कशावरही प्रेम कर
पण मुलीवर कधी करु नकोस ,
ती पण तुझ्यावर प्रेम करेल ,
अशी खोटी आशा धरु नकोस .......
अनेक जण सांगतील तुला की ,
प्रेमात कधी हरु नकोस ..
पण मी सांगतो " हर " ,
स्वत:ची फ़सवणुक करु नकोस ....
ह्र्दय सगळ्यांचच धड्धड्तं ,
त्याला वेड्या प्रेम समजु नकोस ,
जास्तच धड्धड्लं , तर डॉक्टरकडे जा ,
पण मुलीकडे कधी जाऊ नकोस.......

{मेल फॉरवर्ड}

.

प्रेम...


दूरावा म्हणजे प्रेम... दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...
दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...
दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...
दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...
दूराव्यात प्रेमाचं घर

{मेल फॉरवर्ड}


प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतं.. प्रेम करणं सोपं नसतं..
सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी

{मेल फॉरवर्ड}


एका आईची अंतयात्रा..

एका आईची अंतयात्रा..

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
कीनारी पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही

- तुझी प्रेमस्वरुप आई   


{मेल फॉरवर्ड}

मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र

  • ( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. )
  •  उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ
  •  पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.

  •  त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून

  •  दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
  •  त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा
  •  अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
  •  ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती
  •  आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
  •  हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे
  •  पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी.

  •  आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )
  •  आई, असं का ग केलंस?
  •  का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
  •  मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
  •  तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता
  •  झाला मला.
  •  माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त
  •  तुझ्याचमुळे ग.
  •  आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि
  •  रडू नकोस.
  •  आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
  •  तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.

  •  राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
  •  तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
  •  भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात
  •  असूनही मी त्याला
  •  हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने
  •  ढकलत असे. मला लागायचं.
  •  तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच
  •  असते!
  •  कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी
  •  ठेव.
  •  ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली
  •  आहे.
  •  मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"
  •  आहे,
  •  जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

     माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,
  •  तुला बघण्याचा!
  •  एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास
  •  सोसल्यावर तुझा जन्म झाला.
  •  मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

     त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या
  •  आईला बघण्यासाठी मला अजून
  •  सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

     मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर
  •  पडलात.
  •  रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग
  •  तू पप्पांना
  •  गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती
  •  काळजी वाटते,
  •  हे पाहून मला किती बर वाटल होत.

     दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर
  •  काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
  •  तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट
     
  • फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
  •  "मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

     थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो
  •  पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
  •  "सर, अबोर्शन करा..."
  •  डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
  •  मी पोटामध्ये खिदळत होते.

     दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे
  •  जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

     मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या
  •  मोठ्या आईला म्हणाले,
  •  की माझ्या आईला लवकर बर कर....

     नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

    आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
  •  मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
  •  आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत
  •  जायचं आहे.
  •  राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
  • आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या
  • कानाशी म्हण....
  • 'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
  • ............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच......

  • --
  •  
  •  
  •  
  • समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

    {मेल फॉरवर्ड}

बुधवार, २६ जानेवारी, २०११

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिन

             प्रजासत्ताक दिवस हा भारतात दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: १५ ऑगस्टगांधी जयंती: २ ऑक्टोबर). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
IndiaFlagParade.png
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
Prajasattakdin.PNG
या संचलना बरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते.
Multikulti-bhatrat.PNG
या सारखेच सं
चलन भारतातील सर्व राज्यांत आयोजीत केले जाते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.        { नाव नाही माहित }
         
          आज भारतीय प्रजासत्ताक दिन आहे खरा पण मी माझ्या विच्यारुन पाहिले असता त्याने नाही असे उतर दिले.या देशाला आतंकवादी आणि आपल्या भ्रस्ट नेत्याची नजर लागली आहे.  हे सर्व संपेल तेव्हा खऱ्या अर्थाने बोलावे लागेल भारत माता की जय वन्दे मातरम् भारतीय प्रजासत्ताक दिनाचा  विजय असो बरोबर आहेना ?   {महेश सावंत }

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

आजचा दिवस

        

          आजचा दिवस खुपच छान होता मी नेहमी प्रमाणे सकळी लवकर उठलो आणि चाय नास्ता करुन माझ्या ऑफिस कड़े  जायला निघालो होतो.रस्त्या मध्ये एक साईंनचे मंदिर आहे त्यांना नमस्कार करुन पुढे निघालो.तशीच एक मुलगी माझ्या दिशेने येताना पाहिली चेहरा ओळखीचा होता जवळ आल्या वर लक्षात आले की हितर माझी जुनी मैत्रिण आहे.मी फारसा काहि मुलीबरोबर बोलत नसल्या करणाने तिच्याकड़े लक्ष नदेता माझ्या रस्याने मी चलत होतो.तिने स्वताहुन मला हाक मारली  माझ्या कड़े आली आणि म्हणाली तू कसा आहेस? त्या वर मी म्हणालो मी मजेत आहे तू कशी आहेस ?तीही म्हणाली मी पण मजेत आहे.हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी पड़ताच ति अचानक पणे म्हणाली किती वेळ लावलास तु…?हे सर्व करायला ?मला काहिच समजले नाही. मना मध्येच हसूनत तिथून निघुन गेली.त्यावर माझी प्रतिक्रिया काय देऊ हेच मला समजत नव्हते मी काहि बोलू शकलो नाही.गेली कित्तेक वर्ष ती माझ्या बरोबर बोलायची पण ती अजुन असे काहि कधीच बोंली नव्हती.माझ्या बरोबर असे काहि प्रथमच झाले होते.आजच ती असे का बोंली हे मला कळेनासे झाले आणि मी ही तिला कधी असे पाहिले सुद्धा नाही.त्त्यामुळे ते मला समजले नसावे. नंतर मला माहित पडले की माझ्या आई ने तिच्या आई वडिलांना लग्नासाठी विचारले आहे.
                                                   
                                                  
       दूसरी गोष्ट म्हणजे आज मी फेसबुक वर ऑनलाइन एका मुली बरोबर बोलत होतो तीच्याशि आजच माजी मैत्रि झाली होती ती दिसायला ही सुंदर होती.सकाळी १०:०० am पासून संध्याकाळी ६.००pmपर्यंत आम्ही दोघे बोलत होतो.पण तिच्या बरोबर बोलताना असे जारही वाटलेच नाही की ही आजची मैत्रि आहे.तिच्या लिहिण्या मध्ये अशी काहि जादू होती की समजलेच नाही की कधी ६:००pm वाजलेते मी तिला विचारले की तु माझा फोटो पाहिलास का ? ती म्हणाली नाही रे का ? मग मीही बोलों पाहिला असता तर इतका वेळ बोलि नसतीस माझ्या बरोबर त्यावर ती म्हणाली असे का बोलतोस तू ? मी कुणाचा फोटो पाहून मैत्रि करत नाही मला वाटले म्हणून केली ok परत असे बोलू नकोस plz  शेवटची १० मिनिटे ऑफ होण्यासाठी पहिली तू पहिला तू हेच चालु होते. मला पण हेच वाटत होते की ती अशीच बोलत रहावी आणि तिला ही वाटत असावे आणि शेवटी ती ऑफ़ लाइन झाली.पण पुन्हा अचानक ऑनलाइन आली आणि ती बोंली तुजा बरोबर बोलून छान वाटले असाच बोलत रहा काहि तरी होऊ शकते?आणि मी बोलण्या अगोदरच लाइन ऑफ झाली काहि तरी होऊ शकते? हे बोलणे मला काहि समजले नाही. तर असा आजचा दिवस गेला 

                                                                       
                                                                                                                                      {  महेश सावंत  }

 

सोमवार, १० जानेवारी, २०११

थोडा वेळ मिळाला तर हे नक्की वाच...........आवडेल

थोडा वेळ मिळाला तर हे नक्की वाच...........आवडेल

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......(when tears in my eyes)
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.....................
{मेल फॉरवर्ड}