पृष्ठे

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

यंदा कर्तव्य आहे



      
         मी लग्न करायचं तर घरच्यांच्या पसंतीनेच असं ठरवलं होतं. तुम्हाला वाटेल काय मनुष्य आहे हा! स्वतःच्या आयुष्याचा एव्हढा मोठा निर्णय दुसऱ्यांच्यावर सोपवणार? तर तसं काही नाहिये. आणि माझे आई पप्पा बऱ्यापैकी खुल्या विचारांचे आहेत.कधी कधी त्यांच्या बोलण्यातून डोकवायची त्यांची सुनेबद्दलची स्वप्नं. मग मी का त्यांच्या हिरमोड करू.  आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्या सगळ्या मागण्या पुर्ण करतात. थोडक्यात आपणंच त्यांच सर्वस्व असतो. मग त्यांनी जर माझ्या कडून ही एक अपेक्षा ठेवली तर मी ती पुर्ण करायला नको? तुम्हीच सांगा. मी परस्पर एखादी मुलगी पसंत केली आणि ती घरच्यांच्या पसंतीस नाही उतरली, आयुष्यभर मनात हा सल राहणारच ना?  हा त्यांच्या भावनांचा अपमान नाही का? त्यामुळं सर्व संमतिनं मुलगी पसंत करायची असा सारांश.
      मुलीबद्दल काय अपेक्षा असायला हव्यात याचा मी नक्कीच कुणाला सल्ला विचारणार नव्हतो. मला माहिती आहे मी कसा आहे. माझ्यातले चांगले गुण आणि दुर्गुण ओळखण्याइतपत मी नक्कीच सुज्ञ आहे. ज्या दिवशी लग्नाबद्दल सिरिअसली विचार करू लागलो त्या दिवसापसून माझी मुलिंकडे बघायची नजरच बदलली.नंतर नंतर लग्न झालेल्या, ठरलेल्या मित्रांशी थोडं बोलणं वाढवायला सुरू केलं. ते लोकं नक्की काय विचार करून मुलगी पसंत करायला गेले होते. कधी कधी प्रमाणाबाहेर अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्यालाच चिकटून बसतात. मग त्या क्रायटेरिया मध्ये बसणारी मुलगी शोधून सापडत नाही आणि पहिली बघितली जाते, मग दुसरी मग तिसरी असं करत करत मग मुलगी बघणे हा विनोद होउन बसतो .मित्र मैत्रिणिंमध्ये मॅट्रिमोनिअल साईट वरून लग्न जुळवणारे, प्रेम विवाह करणारे आहेत, लग्नापुर्वी स्वतःचं घर असावं म्हणून ३ वर्षे थांबलेलं एक जोडपं ही आहे. जरी सगळ्यानांच ठेचा लागल्या नसल्या तरी मागचा मी मात्र शहाणा बनत होतो. या सगळ्यात माझं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी माझ्याकडे नव्हतं. मुलीबद्दल लग्नासाठी विचार करायचा म्हणजे नक्की कुठून सुरुवात करायची?एव्हढं मोठं शहर, महिन्याच्या महिना खात्यात जमा होणारा पाच आकडी लट्ठ पगार, एकटा, कुटुंबाची कोणतिही जबाबदारी खांद्यावर नसलेला मी.
        तुम्हाला माझी ही मागणी स्वार्थी वाटली का? कृपया तसा गैरसमज करून घेउ नका. मी तिच्या दर महिना कमवून आणणाऱ्या पगाराच्या आकड्याला उद्देशून म्हणत नाहिये. अर्थात तो पैसा आम्हाला आमचा संसार उभा करण्याच्या कामी येइलंच पण मूळ उद्देश हा नाही. यातून दोन हेतू साध्य होतात. म्हणजे नोकरी करण्याइतपत शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्वाचे 'हुशार' 'आत्मविश्वास' आणि 'स्वतंत्रपणा' हे पैलू सतेज होतात. घरातून बाहेर पडल्यामुळे तऱ्हे तऱ्हेचे लोक, त्यांचे स्वभाव, बाहेर काय परिस्थिती आहे, एकुणच सर्वसाधारणपणे म्हणायचं झालं तर जाणीवा व्रुद्धिंगत होतात. पगाराचं आर्थिक पाठबळ मिळतं. खऱ्या अर्थानं ती व्यक्ती सज्ञान झाली असं आपण म्हणू शकतो. आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत आणखी काय करायच्या अपेक्षा असणार?
        लहानाचं मोठं होताना आई वडील यांचे स्वभाव, घरातलं आणि आजुबाजुचं वातावरण याचा सरळ सरळ परिणाम मनावर होतो. विचारसरणीलाही तसंच वळण लागतं. त्यामुळं ती जेव्हा मला भेटेल तेव्हा मी या मुद्द्यावर चर्चा नक्कीच करणार. थोडक्यात काय तर मुलगी सुसंकृत घरातील असावी. आणि माझी ही मागणी गैर नक्कीच नाहिये. बरोबर ना?लग्न झालेल्या मित्र मैत्रिणींमध्ये (परत तुलनत्मक विचार, मागील पानावरून पुढे... क्षमा असावी) किंवा आजूबाजुला पाहा अशी कितीतरी जोडपी दिसतील ज्यांच्या वयामध्ये सरासरी ३ ते जास्तीत जास्त ५ कधी कधी ७ वर्षे अंतर दिसेल. त्या दोघांच्या वयांच्या सोबत वैचारीक पातळीत पण फरक असणारच ना? जरी एखाद्याचं लग्न २७व्या वर्षी ठरत असेल तर त्याची सहधर्मचारिणी २४ वर्षांची. म्हणजे नुकतंच कॉलेज संपवून आयुष्याला नव्या दिशा देण्यासाठी, नव्या वाटा चोखाळण्यासाठी उतावीळ असलेलं एक अल्लड मन! त्याच्या गळ्यात संसाराचं जोखड अडकवलं की करीअरची भरारी,  नावीन्याचे पंख आपोआपच जबाबदाऱ्यांच्या दोरखंडात निष्प्राण होउन करकचून आवळले जातात. वयानं जास्त असणारा नवरा आपोआपच अधिकाराच्या भावनेनं बायकोवर वर्चस्व मिळवण्याचा कळत नकळत प्रयत्न करतो. जाउ दे. तो फार मोठा विषय आहे. पण नाविन्याचे नऊ दिवस ओसरले की आयुष्याची चौकट बनून जाते. मला नेमकं हेच टाळायचंय.
      माझ्या आणि तिच्या वयामध्ये अंतर असणार हे नक्की. कारण ते माझ्या हातात नाही. पण ते एका वर्षापेक्षा जास्त नसावं या बद्दल मात्र मी घरच्यांना स्पष्टपणे सागितले होते.माझे २ मित्र असे आहेत ज्यानीं एकच मुलगी बघितली, तिच त्यानां पसंत पडली आणि तिच्याशीच लग्न केलं.  
  आज मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला.यासाठी मी काहि विशेष तयारी नाही केली. कारण मी जसा आहे तसा मला तिने पाहव असे माझे मत होते.मुलगी रहायला तारापुर आहे.मीही रहायला अंधेरीला आहे यासाठी सर्वांनी असे ठरविले होते की कुठे तरी मधे भेटायचे मग त्यानीच ठरवले की दहिसरला त्याचे पाहुणे राहतात.आम्ही ही सागितले की दहिसरला यायला तयार आहोत.मग माझी कार घेउन मी दहिसरला गेलो .पुढचे  बलने अजुन बाकि आहे. समजले की लिहिन        (परत तुलनत्मक विचार, मागील पानावरून पुढे... क्षमा असावी)

{मेल फॉरवर्ड}